गिरणा नदीला पुर भडगाव शहरातील काठावरील वस्ती व खळे खाली करण्याचे आदेश पोलि

0

भडगाव- सागर महाजन

गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसामुळे गिरणा धरणातून दि.26 रोजी वीस हजार क्युसेस प्र. से. एवढा प्रवाह सोडण्यात आला आहे. तसेच गिरणा नदीला अनेक नद्या- नाले मिळतात त्यांचे पाणी मिळून हे तीस हजार क्युसेस इतके पाणी होऊ शकते अचानक केव्हाही नदी पात्रात पाणी वाढू शकते म्हणून याची सतर्कता बाळगत भडगाव पोलिस व महसूल प्रशासनातर्फे आज शहरातील गिरणा नदी पात्रातील भराडी वस्ती त्यांच्या जीवनावश्यक वस्तू सह आजूबाजूला राहणारे नागरिक व शेतकऱ्यांच्या खेळातील गाई, म्हशी, बैल, वासरू, इत्यादी जागा खाली करून सुरक्षित स्तळी राहण्याच्या सूचना देऊन नदी पत्रात कुणीही जाऊ नये अथवा राहू नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या वेळी भडगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, तहसिलदार माधुरी आंधळे, पो.ना. लक्ष्मण पाटील, पो. हे. कॉ. किरण ब्राम्हणे,तलाठी – राहुल पवार, मंडळधिकारी – तायडे, रोजगार हमीचे- विनोद पाटील आदीसह होमगार्ड यावेळी उपस्थित होते.

भडगाव शहरात जोरदार पाऊस

शहरात आज दुपारी दोन वाजता पाणी सुरू झाला सायंकाळी साडेचार वाजेदर्म्यान बंद झाला या दरम्यान आकाशात संपूर्ण काळोखा पसरला होता.

शहरात लाऊस्पिकर द्वारे सूचना

शहरात गिरणा पात्रात वीस हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होताच प्रशासनातर्फे संपूर्ण गावात लाऊस्पिकर द्वारे लहान मुले, शाळकरी मुले, गावातील नागरिक व शेतकरी यांना सतर्कतेचे सूचना देण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.