”त्या”वादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. छठपूजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या रांची दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केले असून १८ फेब्रुवारीला न्यायालयात  हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

मुंबईचे स्थानिक निवासी अंखुरी अंजनी कुमार यांनी राज ठाकरे यांच्या  वक्तव्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर न्यायालयाने वॉरंट बजावले आहे.राज यांच्याविरोधात यापूर्वीच न्यायालयाने नोटीस जारी केली होती. मात्र राज यांच्याकडून न्यायालयाच्या नोटिशीला कोणतेही उत्तर मिळाले नाही. ‘छठपुजा म्हणजे केवळ नाटक असते’ असे राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे आपल्या मनावर आघात झाल्याचे याचिकाकर्त्यांने म्हंटले आहे.

रांची दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फहीम किरामनी यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने राज यांना 18 फेब्रुवारी 2020 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.