दिल्लीत पुन्हा अग्नितांडव! प्रिंटींग प्रेसला आग

0

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील पटपडगंज औद्योगिक परिसरातील प्रिंटींग प्रेसला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंज एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे काम करत आहेत.

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. आठवड्याभरापूर्वी म्हणजे 2 जानेवारी 2019 रोजी दिल्लीतील पीरागढी येथील एका फॅक्टरीला भीषण आग लागली होती. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या धान्य बाजारात मोठी आग लागली होती. या आगीत होरपळून 43 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर किराडीमध्येही अशाप्रकारची घटना घडली होती. यात 9 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा अशाच एका अग्नीतांडवाची घटना घडली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.