तेली समाज बहुउद्देशिय युवक मंडळाची सभा संपन्न

0

जळगाव 

श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय युवक मंडळाची सभा संपन्न श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय युवक मंडळाची सभा मंडळाचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल स्टार पॅलेस , जळगाव येथे संपन्न झाली.

सदर सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.  सदर ठरावांमध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये वधू – वर पालक परिचय मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच समाजाकरीता समाजाचा स्वर्ग रथ तयार करण्याचा मानस करण्यात आला. तसेच संस्थेचा आजपर्यंतचा आर्थिक ताळेबंद मांडण्यात आला.

सदर सभेप्रसंगी  नंदूभाऊ चौधरी, सिताराम देवरे, संतोषआप्पा चौधरी, रविंद्र चौधरी, बी.एम.चौधरी, डी.ओ.चौधरी, व्ही.आर.पाटील, प्रभाकर महाले, दशरथ चौधरी, अनिल पाटील, प्रशांत सुरळकर, रामचंद्र चौधरी, विनोद चौधरी, भगवान चौधरी, किरण चौधरी, भगवान हिरामण चौधरी, मधुकर देवरे, कमलाकर चौधरी, भिकन चौधरी, सुभाष चौधरी, विशाल पाटील, दिपक दत्तात्रय चौधरी, दिपक धनराज चौधरी, पी.सी.चौधरी, मेघश्याम चौधरी, अनंत चौधरी, संतोष सांडू चौधरी आदी ज्येष्ठ व श्रेष्ठ समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अनिल रामदास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन  दशरथ रमेश चौधरी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.