तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार !

0
46 शुभमुहूर्त : मे महिन्यात सर्वाधिक
 
जळगाव, प्रतिनिधी – हिंदू धर्मात तुळशी विवाह झाल्यानंतर लगीनघाईचे दिवस सुरू होतात. यंदा  20 नोव्हेंबरपासून  विवाहसाठी  मुहूर्त  सुरू होणार असून जुन 2020 पर्यंत चालणार आहे.  म्हणजेच आठ महिन्याच्या काळात 46 लग्नतीथि  आहेत.  मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने हा  महिना लग्नाच्या धामधुमीचा ठरणार आहे.
दिवाळी सण झाल्यानंतर तुळशी विवाहाला  प्रारंभ होतो. ८ नोव्हेंबर रोजी  तुळशी विवाह आहे. यावर्षी तुळशी विवाहानंतर तब्बल ९ दिवसांनी विवाह मुहूर्त प्रारंभ होणार आहे.  तसेच यावर्षी डिसेंबर महिन्यापासून गुरूचा अस्त असल्यामुळे महिनाभर शुभ मुहूर्त राहाणार नाही. यावर्षी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत एकुण २२ मुहूर्त असल्याचे वधु वर पित्याची आता पासून लगीनघाई सुरू झाली आहे.  गतवर्षी गुरूचा आस्त असतांनाही ८६ मुहूर्त होते. मात्र, यावर्षी गुरु अस्त लग्न सराईत आल्यामुळे ४६  मुहूर्त आहेत. यंदा  कर्तव्य असणाऱ्या घरात दिवाळीपेक्षा लग्न सराईत घाई बघायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षात गतवर्षीपेक्षा मुहूर्त कमी असल्यामुळे लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय  मिळवणे अवघड ठरणार आहे. त्यासाठी आतापासूनच मंगलकार्य मिळवण्यासाठी घाई करण्यात येत आहे‌
असे आहेत विवाह मुहूर्ता
नोव्हेंबर- 20, 21 ,23 ,28
डिसेंबर-1,2,3,6,8,11,12,
जानेवारी-18 ,20,29,30,31
फेब्रुवारी-1,4,12,14,16,20,27,
मार्च-3,4, 8,11,12,19,
एप्रिल-15,16,26,27,
मे-2,5,6,8,12,14,17,18,19,24,
जुन-11,14,15,

Leave A Reply

Your email address will not be published.