बोदवडातील भाजपच्या कार्यकर्त्यांमधील आपापसांतील मतभेद चव्हाट्यावर

0

रोहिणी ताईंच्या पराभवाला जबाबदार असलेले ते भाजपमधील पदाधिकारी आणि ठेकेदार कोण?

बोदवड (सुनिल बोदडे)- नुकत्याच विधानसभा निवडणुकीत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसें यांना पराभव पत्करावा लागला.हा पराभव पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वाद व हमरीतुमरीमुळे झाला असून ज्या पदाधिकाऱ्यांमुळे हा पराभव भाजपच्या वाट्याला आला त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत अशी मागणी शहरातील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते तथा तत्कालीन भुसावळ पंचायत समिती माजी सदस्य अमरिश जैस्वाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.या प्रसिद्धी पत्रकातून भाजपा कार्यकर्त्यां मधील आप-आपसातील मतभेद व आपणचं मोठे असल्याचा कांगावा गाणें हे चव्हाट्यावर आहे हे मात्र नक्की.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणीताई खडसें यांना भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी दिली होती.मात्र राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी यांचा अवघ्या १९८७ मतांनी पराभव केला.त्यात बोदवड तालुक्यातून मताधिक्य मिळाल्याने आ.चंद्रकांत पाटील यांचा या अटीतटीच्या लढतीत विजय झाला.

मात्र बोदवड तालुक्यातून पक्षाला अपेक्षित असलेले मतदान न झाल्याने हा पराभव झाला.हा निसटता पराभव निव्वल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना दिलेली खोटी आकडेवारी व त्यांच्या अकार्यक्षमपणामूळे झाला असून आपणचं मोठे असल्याचा दावा करणारी पदाधिकारी मंडळीचं याला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप श्री.जैस्वाल यांनी पत्रकातून केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बोदवड तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपापसांत वेगवेगळे गटतट आहेत त्यातील काही जर स्वार्थापोटी तर शासकीय ठेके मिळणे साठी नाथाभाऊंचा गवगवा करीत असतात असा सूर दबक्या आवाजात सुरू होतो.मात्र श्री.जैस्वाल यांनी दिलेल्या पत्रकातून ही बाब उघड झाली आहे. पदाधिकाऱ्यांनी योग्य ती परिस्थिती नाथाभाऊंना कळविली असती व आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून अपेक्षित मतदार मिळणेसाठी प्रयत्न केले असते तर चित्र वेगळे असते असा निकष त्यांनी दिलेल्या पत्रकावरून काढता येईल.

श्री.जैस्वाल यांनी केलेले गंभीर आरोप पाहता रोहिणी ताईंच्या पराभवाला जबाबदार असलेले ते भाजपमधील पदाधिकारी व ठेकेदार कोण? खरंच नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाधिकारी राजीनामे देतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.तर रोहिणी ताईंच्या या निसटत्या पराभवाला जबाबदार असलेल्या पदाधिकाऱ्यांवर पक्षाच्या नियमांनुसार नाथाभाऊ काय कारवाई करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.