तलाठी व कोतवालला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वाळू चोरी विरोधी गस्तीवर असलेल्या पथकाला वाळू चोरांकडून मारहाण करून वाळूने भरलेले २ ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना भडगाव तालुक्यातील कोळगाव गावाजवळ घडली. याबाबत तलाठ्याच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला ३ जणांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १९ रोजी सकाळी ७ वाजता कोळगाव गावाजवळील पाटचारी जवळ मुरलीधर आनंदा पाटील यांच्या शेताजवळ वाळू चोरीच्या पथक गस्तीवर असताना तलाठी व पथकातील अन्य दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू वाहतूक करताना आढळून आले. यावेळी पहिल्या ट्रॅक्टर वरील चालक समाधान युवराज पाटील (रा. वाक) व दुसऱ्या ट्रॅक्टर वरील चालक अजय रवींद्र मोरे (रा. वाक) वाहतूक करताना थांबवून त्यांना हे ट्रॅक्टर तहसीलला जमा करण्याचे सांगितले.

मात्र याचवेळी ट्रॅक्टर मालक संजय त्रिभुवन यांनी येऊन बाचाबाची केली. हातातील मोबाईल फोडून धक्काबुक्की करून पथकातील कोतवाल राजेंद्र थोरात यांनाही  मारहाण केली व त्यांची डिस्कवर एम एच १९ बी एल ८५७८ या मोटरसायकलचे नुकसान केले. व मालकाच्या सांगण्यावरून वाळूने भरलेल्या दोन्ही ट्रॅक्टर चालकांनी पळवून नेले म्हणून शिवाजी कौतिक पारधी (वय ५२) शिंदी गावचे तलाठी, राहणार बालाजी नगर पारोळा यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात गुरनं २९६ / २१ भादवी कलम ३५३ ,३३२, ३७९, ४२७, ५०६, ३४ जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४८ (८ ) प्रमाणे आरोपी- समाधान युवराज पाटील, अजय रवींद्र मोरे, संजय सुरेश त्रिभुवन रा. वाक. ता. भडगाव या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.