तरुणाची धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

म्हसावद ते माहेजी दरम्यान रेल्वेच्या अप लाईनवर आज सकाळी तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी साडेआठ वाजेपुर्वी घडलेल्या या घटनेबाबत रेल्वे स्टेशन मास्टर यांनी दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

सागर गणेश खडसे (वय- २२, रा. दहीगाव संत ता.पाचोरा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  या तरूणाने  म्हसावद ते माहेजी रेल्वे अपलाईन खंबा क्रमांक ३९४/११-१२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.