डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पेण येथे वृक्षारोपण

0

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आध्यात्मिकते बरोबरच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पेण तालुक्यातील उंबर्डे येथील वनखात्याच्या जागेवर रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. याठिकाणी 600 वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी पेणचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रसाद गायकवाड, वनपाल चौधरी, वनरक्षक उगले, वारडे आदींसह पेण तालुक्यातील 16 बैठकांतील श्री सदस्य उपस्थित होते.

पेण वनपरिक्षेत्र हद्दीतील उंबर्डे येथील साडेबारा एकर जागेवर फणस,जांभूळ, काजू, आवळा, पेरु, सीताफळ, बाहवा,कांचन,शिवण, रामफळ, बेहडा, करंज, विलायती चिंच, काशीद, वाबळा, शिसव ,बेल आदि वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळी या उपक्रमात पेण तालुक्यातील वाशी नाका ,वाशी, रावे, वरवणे, वरसई, सापोली, धावटे, आंबिवली, जिते, हनुमान पाडा,दादर,शिर्की, वडखळ, भाल या सोळा बैठकांतील 432 श्री सदस्यांनी सहभाग घेतला.

या पूर्वी 2013 मध्ये याच वनपरिक्षेत्र मधील 5 एकर जागेत 4172 वृक्षांचे रोपण करुन 5 वर्षे त्यांचे उत्तमरीत्या संगोपन करुन वनाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आज त्या ठिकाणी वृक्षांचे अरण्य तयार झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.