डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

0

भुसावळ  (प्रतिनिधी)- येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सी.बी.एस.ई.स्कूल भुसावळचे स्नेहसंमेलन (Esprit de Corps २०१९-२०’) मोठया उत्साहात पार पडला. स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणुन एस जी एम ऑडनर्स फॅक्टरी वरणगांव व डब्लु डब्लु ए सौ.निवेदिता चटर्जी उपस्थीत होते. यावेळी संस्था अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, प्रिन्सीपल सौ.अनघा पाटील, इ. मान्यवर यावेळी उपस्थीत होते.स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी एस चटर्जी यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले.

तर डॉ.उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन करतांना इ. १० च्या सी.बी.एस.ई परीक्षेत सर्व घवघवीत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देवुन त्यांना देशातील यशस्वी माणुस बनविण्याचे ध्येय या शाळेने घेतले असुन त्यासाठी सर्व प्रशासन प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य, नाटय, सादर करून आपल्यातील कलागुण सांस्कृतीक कार्यक्रमातन सादर केले व सर्व उपस्थीतांचे मन मोहुन टाकले. मान्यवरांनी, पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतक केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मच्याऱ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अंकीता राजने व सौ.महवीस शेख यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.