राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश संघटक वंदना चौधरींनी घेतली शरद पवारांची भेट

0

लोहारा ता.पाचोरा (प्रतिनिधी) : – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश संघटक वंदनाताई चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची औरंगाबाद येथे भेट घेतली.  त्या क्षणी त्यांनी महिलांच्या सक्षमीकरण,संरक्षण या विषयावर चर्चा करून जामनेर विधानसभा मतदार संघ,कुर्हाड सर्कल याकडे विशेष लक्ष देऊन गावाच्या बाजूला असलेल्या गोल टेकडी प्रकल्पाकडे लक्ष द्या व काम प्रत्यक्ष सुरू करा अशी आग्रही मागणी यावेळी केली. यावेळी अशोक चौधरी(पीए),चिरंजीव शुभम ,यशोदीप उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.