तर खडसेंनी महाविकास आघाडीत प्रवेश करावा ; अजित पवार

0

मुंबई : भाजपचे नाराज असलेले एकनाथराव खडसे यांना जर राजकारणात टिकायचे असेल तर सत्ताधारी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीत तिकीटही न मिळवू शकलेले व निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यामुळं खडसे पक्षावर प्रचंड नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत शरद पवार व मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दरम्यान, कालदेखील खडसे यांनी शरद पवार यांची अज्ञातस्थळी भेट घेतली होती. त्यामुळे खडसे हे भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यावर अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. खडसे हे गेल्या काहीदिवसापासून अस्वस्थ आहे. भाजप त्यांच्यावर अन्याय करीत आहे. खडसेंनी पक्ष बदलाचेदेखील संकेत दिले आहे. खडसे जर राजकारणात टिकायचे असेल तर सत्ताधारी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करायला हवा, असे अजित पवार म्हणाले होते. अजित पवार यांनी पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी भेट दिली. तसेच त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.