ठेवीदारांतर्फे थाळी बजाओ आंदोलन

0
जळगाव ;-  राज्यात २६४ शाखा असलेल्या राज्यभरातील बीएचआरच्या ठेवीदारांना तत्काळ ठेवी परत मिळाव्यात यासह अनियमितता केलेल्या पतसंस्था चालकांवर ई.डी. अंतर्गत कारवाई व्हावी यासह ठेवीदारांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जनसंग्राम बहुजन लोकमंच प्रणित राज्य ठेवीदार संघटनेच्यावतीने येत्या २९ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात ठेवीदारांतर्फे थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले .
सावदा येथे बीएचआर व जळगाव जिल्ह्यातील विविध पतसंस्थांच्या ठेवीदारांची आढावा बैठक २७ मे रविवार रोजी जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली होती .
त्यानुसार आज थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले . जिल्ह्यातील ठेवींचा प्रश्न १० वर्षांपासून जैसे थे आहे. बीएचआर संस्थेच्या ठेवीदारांनासुद्धा अवसायक यांचे ठेवी वाटपाचे गुंतागुंतीचे धोरण असल्याने ठेवींसाठी वणवण भटकावे लागत आहे..याकडे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले .
——–या आहेत मागण्या ——–
बीएचआर पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्ता विक्रीतून ठेवीदारांना सरसकट १०० टक्के व्याजासह ठेवी मिळाव्यात, ही जनसंग्राम संघटनेची प्रलंबित मागणी आहे.एमपीआयडी कलमाने गुन्हा दाखल केलेल्या ठेवीदारांना तीन महिन्यात गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याचे प्रावधान असतांना संचालकांच्या मालमत्ता विक्रीसाठी शासनाच्या गृह विभागाचे अवर सचिव (अपील व सुरक्षा) यांच्याकडे अधिसूचना प्रसिद्ध होण्यासाठी विलंब होत आहे.अवसायक व जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवींच्या रकमेची अफरातफर करणाऱ्या व जबाबदारी निश्चित होऊन गुन्हे दाखल झालेल्या संचालकांवर शासनाने प्रस्तावित केलेली पण त्यांनतर थंड बस्त्यात पडून असलेली ई.डी.अंतर्गत कारवाई तत्काळ व्हावी व लोकशाही दिनातील यापूर्वी दाखल तक्रारींचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या .
————-शासनाचा कर बुडविलेल्या पतसंस्थांची चौकशी व्हावी ——
जिल्ह्यातील अनेक पतसंस्था चालकांनी ठेवीदारांना मुद्दल रक्कम परत  करून  त्यावरील व्याज संचालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्याद्वारे इमारत ,मोकळे प्लॉट खरेदी केले असून त्यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी ठेवीदारांकडून केली जात आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.