पुणे येथील मुग्धा कौशिक जपान येथे रवाना

0
पुणे;-  ;- येथील मुग्धा गिरीष कौशिक ही नुकतीच जापान येथे शैक्षणिक सहलीसाठी रवाना झाली आहे.
पुणे येथील अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या 36 विद्यार्थिनी व 7 शिक्षिका दोन देशांमधील आदान-प्रदान उपक्रमांतर्गत मऑल इंडिया फ्रेंड्स ऑफ जापानफ च्या सहकार्‍याने या विद्यार्थिनी व शिक्षिका जपानला गेल्या आहेत.   सात दिवसांच्या या शैक्षणिक भेटीत त्या जपानमधील दोन शाळांना भेट देणार आहेत. तसेच विद्यार्थीनी लेझीम, योगासने, पणत्या रंगणवे, पेपर क्विलिंग प्रशिक्षणासह विविधि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे जपानी भाषा व संस्कृतीचाही अभ्यास करणार आहेत. जपानमधील विद्यार्थ्यांना या विद्यार्थींनीं  कौशल्य प्रशिक्षण देणार आहेत. मुख्याध्यापिका सुलभा शिंदे, पर्यवेक्षिका स्मिता करंदीकर, शिक्षीका अर्चना मोरे, प्रज्ञा करडखेडकर, वर्षा गानू, सीमा डोईफोडे व अव्दैत उमराणीकर या विद्यार्थीनीसह या  विद्यार्थीनीसह जपानला गेल्या आहेत. ऑल इंडिया फे्रेंडस ऑफ जपान च्या स्वाती भागवत आणि नीता करपे यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. ती गिरीश कौशिक व सौ. स्वाती  कौशिक यांची मुलगी आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.