सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

0

मुंबई : 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल ८६.७० टक्के लागला आहे. यावर्षी एकूण १६ लाख २४ हजार ६८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ८ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

प्रखर मित्तल, रिमझिम अग्रवाल, नंदिनी गर्ग आणि श्रीलक्ष्मी जी. या चौघांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवत संयुक्तरीत्या प्रथम स्थान पटकावले आहे. तिरुवनंतपूरममध्ये सर्वाधिक ९९.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्राचा समावेश ज्या विभागात होतो, त्या चेन्नई विभागाने (९७.३७) बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना http://www.cbse.nic.in/ या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला बैठक क्रमांक देऊन निकाल पाहता येणार आहे.

मुलींची बाजी

सीबीएसई दहावी बोर्डाच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. एकूण ८८.६७ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून ८५.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.