ठेवीदारांना तत्काळ दिलासा द्या अन्यथा ईडीची कारवाई – सहाय्यक निबंधक मुकेश बारहाते

0

जळगाव- तालुक्यातील ज्या पतसंस्था ठेवीदारांना ठेवी परत करण्यात दिरंगाई करीत आहेत अशा संस्था चालकांवर ई.डी. मार्फत कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याने ठेवीदारांना तत्काळ दिलासा द्या अशा सक्त सूचना सहाय्यक निबंधक डॉ.मुकेश बारहाते यांनी दिल्या.जनसंग्राम संघटना प्रणित राज्य ठेवीदार समितीच्या वतीने जळगाव तालुक्यातील अडचणीतील तालुकास्तरिय २०,जिल्हास्तरीय २,विभागीय १ अशा सर्व २३ व अडचणीत नसलेल्या ४ पतसंस्थांच्या ठेवीदारांना ठेवींच्या रकमा परत मिळाव्यात म्हणून संस्थाचालक,अधिकारी व ठेवीदारांची संयुक्त आढावा बैठक जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात १९ मे रोजी घेण्यात आली.

जळगाव तालुका सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक डॉ.मुकेश बारहाते यांनी बैठकीनंतर जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांना ठेवीदार संघटनेच्या प्रतिनिधींच्या अडचणी व बैठकीचा आढावा सादर केला.यापुढे दरमहा तालुका स्तरावर कॅम्प लावून ठेवी परत करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येतील असे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी स्पष्ट केले.जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे, सहाय्यक निबंधक व महालक्ष्मी पतसंस्थेचे अवसायक अशोक बागल,,सहकार अधिकारी महेंद्र देवरे व सहाय्यक अवसायक प्रकाश झोपे आदी यावेळी उपस्थित होते.

महालक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवीदारांना चेक वाटप-
गेल्या ८ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या यावल येथील महालक्ष्मी पतसंस्थेच्या काही ठेवीदारांना हार्डशिप म्हणून ठेवींच्या प्रमाणात चेक वाटप करण्यात आले.मिराबाई भागवत ढाके,शांताबाई माणिक कुंभार,अनिता माणिक कुंभार,उषा भोजराज गायकवाड,राजाराम वामन नेमाडे,धनंजय गणपत उंबरकर,पौर्णिमा गणपत भंगाळे या अत्यंत अडचणीतील ठेवीदारांना चेक मिळाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.

संस्थाचालकांच्या दारी थाली बजाओ आंदोलन
अडचणीत नसलेल्या पतसंस्थानी जनसंग्राम संघटनेच्या सभासद ठेवीदारांना महिनाभरात किमान २५ टक्के ठेवी परत कराव्यात अन्यथा गावोगावी संचालकांच्या दारी थाली बजाओ आंदोलन करण्यात येईल असा ईशारा विवेक ठाकरे यांनी दिला.

दरम्यान,जळगाव तालुक्यातील सर्व व बढेसर,तापी चोपडा,पूर्णवाद,काळा हनुमान,जय माता दी,विठ्ठल-रुखमाई व फैजपूर मर्चंट या संस्थांच्या ठेवीदारांची आढावा बैठक २९ मे रोजी जिल्हा उपनिबंधक यांनी आयोजित केली असून जनसंग्राम संघटनेच्या ठेवीदार सभासदांनी उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.बैठकीचे प्रास्ताविक डी.टी. नेटके यांनी केले.यशवंत गाजरे, नामदेव भोळे, डॉ.दिलीप पाटील,एकनाथ भंगाळे, निला चौधरी,किरण राणे,सुमन राणे, कल्पना कोल्हे,मिराबाई ढाके,वैशाली कोल्हे, मनिषा चिरमाळे, विमल येवले आदी ठेवीदार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.