पारोळा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर कुटीर रुग्णालयाजवळून रस्त्याने पायी चालणाऱ्या एका इसमाला ट्रकचालकाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि ४ रोजी सकाळी ८ वाजता घडली. याबाबत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील राष्ट्रीय महामार्ग वर कुटीर रुग्णालयाजवळ दि. ४ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हिरामण चिंधु भिल (रा लोणवडी जि. जळगाव) हा इसम रस्त्याने पायी चालत असताना मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक (क्रमांक आर जे 03 बी व्ही 9882) ने जोरदार धडक दिली व तेथून तो फरार झाला. यावेळी धनराज केशव पाटील (रा कोळी गल्ली) याने हा अपघात आपल्या डोळ्यानी बघितला. सदर इसमास कुटीर रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला याबाब आज धनराज पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पारोळा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो कॉ बापू पाटील करीत आहे.