टेन्ट हाऊस असोसिएशनकडून निषेध!

0

भरीत महोत्सव आयोजित मराठी प्रतिष्ठानचा

जळगाव –
मागील थकबाकी न दिल्याच्या कारणावरुन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार्‍या भरीत महोत्सवाचा टेन्ट हाऊस व लायटींग डेकोरेटर्स असोसिएशनने दि. 17 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत निषेध व्यक्त केला.
यावेळी टेन्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ उपाध्यक्ष प्रितिश चोरडिया, सचिव सुनिल लुल्ला, कार्याध्यक्ष राजेश चोरडिया, लायटींग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष दप्तरे,कार्याध्यक्ष जयेश खंदार, रोहित दाणेज उपस्थित होते.
मागील वर्षी मराठी प्रतिष्ठानतर्फे सागर पार्क येथे कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी रेणुका टेन्टचे साडेचार लाख रु. भाडे अद्यापही अदा केलेले नाही. गेल्या वर्षाभरापासून ते भाड्यासाठी फिरवत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ व रेणुका टेन्टचे संचालक धिरज कलाल यांनी परिषदेत केला. याबाबत मराठी प्रतिष्ठानने हात वर केल्याचा आरोप करण्यात आला. याचा निषेध म्हणून दि. 21 डिसेंबर रोजी शांततेच्या मार्गाने सागर पार्कवर उद्घाटनाच्या वेळी निदर्शने व काळ्या फिती, झेंडे लावून निषेध व्यक्त करणार आहेत. तसेच सदर दोन्ही संघटनांतर्फे थकबाकीदारांचे काम थकबाकी अदा केल्यानंतरच करण्यात येणार असल्याचा ठराव पारीत करण्यात आला. थकबाकीदारांमध्ये अनेक संस्था असून शासनाकडेही थकबाकी असल्याची माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली.
विश्वविक्रमी कढईची शोभायात्रा
2 हजार 500 किलो वांग्याचे भरीत बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या 10/10 आकाराच्या विश्वविक्रमी महाकाय कढईची दि. 17 रोजी दुपारी 4 वाजता काव्यरत्नावली चौकातून शोभायात्रा काढण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.