बेजबाबदार अधिकार्‍यांची टोलवा- टोलवी : नगराध्यक्षा मनीषा चौधरी

0

गूळ मध्यम प्रकल्पातून अतिरिक्त पाणी साठा सोडला : प्रवाश्यांना बोटीचा आधार

चोपडा  –
राज्यभर भीषण पाणी टंचाई असताना दुसरीकडे मात्र गूळ मध्यम प्रकल्पाचे अधिकार्‍यांनी बेजबाबदार पणे आवर्तन सोडले. प्रत्यक्षात चोपडा नगरपालिकेला किती क्यूसेक पाणी लागणार यावर कोणीच उत्तर न दिल्याने जास्तीचे पाणी सोडले गेले तरी ते अधिकार्‍याचा बेजबाबदार असल्याची गंभिर टीका नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी केली आहे.
एकीकडे सर्व महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना शहराला पिण्याच्या पाण्याची उणीव भासत आहे .पण या परिस्थितीची जाणीव गूळ मध्यम प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना नसल्याचे स्पष्ट झाले आहे प्रकल्पातून किती पाणी सोडले हे कोणीच सांगू शकले नाही.पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होईपर्यंत आवर्तन सोडण्यात आले अशी माहिती गुळी नदीवर असलेल्या गावकरी व शेतकर्‍यांनी दिली आहे.
शहराला अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा होती तेव्हा चोपडा नगर पालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी यंदाच्या पावसाळा नंतरचे पहिले आवर्तन 16 डिसेंबर दुपारी 2.30 च्या सुमारास गूळ प्रकल्पातून सोडण्यात आले वेग फार जोरात असल्याने कठोरा येथिल पालिकेचा बधांरा तुटला आणि पाण्याची मोठी नासाडी झाली.अधिकार्‍यांना पालिकेने माहिती देऊन देखील गुळीच्या पाणी सोडण्याच्या खिडक्या बंद केल्या गेल्या नाहीत. अतिरिक्त पाण्यामुळे मोट्या प्रमाणात अपव्यय झाला आहे. हेच पाणी नियोजन करून सोडले असते तर तालुक्याला एक जास्तीचे आवर्तन मिळाले असते. अश्या बेजबाबदार अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी तालुक्यातील शेतकरी व चोपडा शहरवासीय करीत आहेत तर असाच हलगर्जीपणा अधिकार्‍यांचा कायम राहिल्यास चोपडा शहराला उन्हाळयात पाणी विकत घेण्याची वेळ येईल अशी भावना घनश्याम भाऊ अग्रवाल मित्र मंडळाचे पाणी फाऊंडेशन चे अध्यक्ष नितीन निकम यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.