अतिक्रमण कारवाईमुळे बांधकाम कारागीरांना अच्छे दिन

0

जळगांव –
शहरात गेल्या देान तीन दिवसापासून मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे कठोर कारवाई करण्यात येत असून अनेक दुकानदार, व्यावसायिकांनी मर्यादेपेक्षा जास्त जागा व्यापून मनपा हद्दीत अतिक्रमण केले होते ते काढण्यात आल्याने बराच परीसर मोकळा झाला असला तरी दुकानदारांना हटविलेलेले अतिक्रमण जागा दुरूस्त करण्यासाठी बांधकाम कारागीरांना मात्र अच्छे दिन आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपुर्वी वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या वाहनाला रेल्वे स्थानकावर एका व्यक्तिस धक्का लागण्याच्या कारणावरून शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नी तक्रार केली होती. शहरातील वाढते अतिक्रमण, परीसरातील नालेगटारांच्या समस्या, स्वच्छतागृहे हा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधींचा जिव्हाळयाचा प्रश्नावर नेहमीच पडदा टाकला जातो. परंतु त्याला अपवाद तत्कालीन प्रांताधिकारी जलज शर्मा व मनपा प्रभारी आयूक्त तथा जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी गोलाणी मार्केट मधे अस्वच्छतेच्या कारणावरून मार्केटच तब्बल 4 दिवस बंद ठेवण्याचे आदेश देउन स्वच्छता तर केलीच परंतु शहर परीसरातरील अतिक्रमण देखिल काढले होते. या कारवाईनंतर अनेक स्थानिकांनी पोटापाण्याचा कळवळा म्हणून अतिक्र मितांचे समर्थन देखिल केले होते. याचा थेट मंत्रालयापर्यत गाजावाजा होउन अतिक्रमण हटाव कारवाई थंड बस्त्यात पडली होती. मनपाच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर होण्यापूर्वी आयूक्तपदी चंदकात डांगे यांनी पदभार घेवून शहरास स्वच्छतेच्या संकल्पाला प्राधान्य देउन अनेक ठिकाणी आरोग्य विभागातर्फे केली होती.
गेल्या 2 ते 3 दिवसापासून अतिक्रमण हटाव कारवाई तिव्र करून परीसरातील दुकानदारांच अतिक्रमणात येणारे ओटे, बांधकाम हटवून कारवाई केली यामुळे रस्ते ठिकठिकाणी मोकळे झाले आहेत. परंतु कारवाई झाल्यानंतर तोडलेले बांधकाम व्यवस्थित करण्यासाठी दुकानदार व्याववसायीकांना बांधकाम कारागीरांची आवश्यकता पडली. शहरात एकाच वेळी अनेक परीसरात मोठया प्रमाणात कारवाई झाल्याने या बांधकाम कारागीरांना एक प्रकारे अच्छे दिन आले आहेत. एका वेळी कोणतही एकच काम कारागीर पूर्ण करू शकतो. यामुळे दुरूस्तीची कामे अनेक कामगार मोजकेच अशा परीस्थितीत सर्वाना मजुर मिळणे दुरापास्त झाले आहे तर दुसरीकडे कामगार वर्ग दुकानदारांना त्याचा आब रूतबा बघून जास्तच काम असल्याचे भासवून जास्तीचे पैसे मागून घेत असल्याचे बहुतांश व्यावसायिकांनी खाजगीत बोलतांना सांगीतले. तोडलेल्या ठिकाणी दुरूस्तीचे कामाची किंमत सांगीतली तर दुकानदार ती मान्य करीत नाहीत व कारागीर देखिल हातात काम आहे हि सबब सांगून कामाची मजूरी पदरात पाडून घेतल्या शिवाय काम स्विकारत नाहीत. एवढे मात्र नक्की अतिक्रमण हटाव कारवाईमुळे बांधकाम कारागीरांना मात्र अच्छे दिन आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.