पंचायत समिती सभापती व त्यांच्या भावा विरुद्ध गुन्हा दाखल

0

पाचोरा –
पंचायत समितीचे सभापती बन्सीलाल पाटील व त्यांच्या भावाविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून पोस्टेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भातखंडे खुर्द येथील महिलेने तक्रार दिली की, भातखंडे- परधाडे शिवारातील गिरणा नदी पात्रातील विहिरीवर रिंग टाकण्याच्या कारणावरून रविवार दि.16 रोजी सकाळी नऊच्या सुमारास पंचायत समितीचे सभापती बन्सीलाल पाटील व त्यांचे भाऊ मुकेश पाटील यांनी नदीपात्रात विहिरी जवळ येऊन शाब्दिक चकमक उडाली. महिलेला अश्लील शिवीगाळ करत डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून दूखापत केली जीवे ठार मारण्याची धमकी दिली व गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसकावली या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांनी सभापती बन्सीलाल पाटील व मुकेश पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज शिंदे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.