झारखंड येथील तरुणास झालेल्या मारहाणीचा पाचोऱ्यात कॉंग्रेसकडुन निषेध

0

पाचोरा :- झारखंड येथे माॅबलेचींग घटनेत तरबेज अन्सारी या तरुणास जमावाकडुन अमानुषपणे मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा पाचोरा तालुका व शहर काँग्रेस कडुन निषेध व्यक्त करुन तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देवुन ही घटना राष्ट्रीय एकतेला तडा देणारी असल्याने अशा घटना घडु नये म्हणून सरकारने कायद्यात विशेष तरतूद करावी. व कठोर शिक्षेचा कायदा पारित करुन घटनेत बळी पडलेल्या तरुणाला आणि त्याचे कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशा आषयाचे निवेदन देण्यात आले.

निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, शहर अध्यक्ष अॅड. अमजद खान अहमद खान, पंचायत समितीचे माजी सभापती शेख ईस्माइल शेख फकीरा, सरचिटणीस प्रताप पाटील, शेख जावेद, शेख इरफान मणियार, अनिल पाटील, शेख आबीद शेख अजिज, इस्माईल तांबोळी, मुख्तार शहा, मुशर्रफ खान, विकास वाघ, नंदकुमार सोनार व नंदकुमार मुळे यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.