कुलरच्या विजेचा धक्का लागल्याने ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

0

जळगाव :- घरात खेळतांना कुलरला हात लागल्याने विजेचा धक्का लागून एका सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी खंडेराव नगरमध्ये घडली. आरो सुनील भोईर (वय ६) असे या चिमुकल्याचे नाव आहे. दरम्यान याबाबत रामानंदनगर पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आरो हा सकाळी घरात खेळत असतांना त्याचा पत्र्याच्या कुलरला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने तो दूर फेकला गेला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांनी मृत घोषित केले. दरम्यान या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.