सायकलवारीत १२ वर्षीय मुलाला ट्रकनं चिरडलं

0

नाशिक : नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकलवारीत सहभागी झालेल्या १२ वर्षीय सायकलपटूला सिन्नरजवळ एका ट्रकनं उडविल्याची घटना आज सकाळी घडली. प्रेम सचिन निफाडे असे या मृत मुलाचे नाव आहे. नाशिकहून सायकल वारीला सुरुवात झाली. या वारीत दुसरीत शिकणारा प्रेम निफाडे सहभागी झाला होता.

नाशिकहून निघालेल्या सायकलवारीनं आज सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. या वारीत जवळपास ८०० जण सायकलपटू सहभागी झाले होते. त्यात लहान मुलंही होती. नाशिकचे जिल्हाधिकारीही या वारीत सहभागी झाले होते. मात्र, या वारीत दुर्दैवी घटना घडली. सिन्नर येथे वारीत सहभागी झालेल्या १२ वर्षीय सचिनला एका ट्रकनं चिरडलं. यात त्याचा जागीच मृत्यू या दुर्घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वारीमध्ये लहान मुलांना सहभागी करुन का घेतले. लहान वयात हे कशासाठी, अशी संतप्त प्रतिक्रिया येथे उपघातानंतर पाहायला मिळाल्यात.

दरम्यान, ट्रक चालक कृष्णा बबन राऊत (रा. राजगुरू नगर, ४९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलाचे शव विच्छेदनासाठी सिन्नर शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.