ज्येष्ठ अभिनेते अरुण बक्षी यांचा भाजप प्रवेश

0

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या वातावरणामध्ये बॉलिवूड अभिनेत्यांचा राजकीय पक्षांमधील प्रवेश सुरूच आहे. अभिनेता अरूण बख्शी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिहं यांच्या उपस्थितीत अरूण बख्शी यांनी पक्षात प्रवेश केला.

शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांच्या उपस्थितीमध्ये अभिनेते अरुण बक्षी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपमधील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, अरूण बक्शी यांनी 1981 मध्ये आपल्या सिनेमातील कारकिर्दिस सुरूवात केली होती. त्यांनी 100 पेक्षा अधिक हिंदी सिनेमात काम देखील केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.