पुणे येथील गुन्ह्यातील कुख्यात चैन चोर भुसावळात जेरबंद

0

आरोपी पुणे पोलिसांच्या स्वाधीन

भुसावळ :-  येथील पापा नगर भागात दडून बसलेले दोघे कुख्यात चैन तोड चोर यांच्या येथील बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्याची घटना शुक्रवार रोजी रात्री येथे घडली. या कुख्यात चैन तोडणा-या  दोघां आरोपीना बाजारपेठ पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.

बिबवेवाडी पुणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक  पोलिस निरीक्षक  पावसे हे  बिबेवाडी पुणे पोलिस स्टेशन ला भाग 5 गुरन 162/2019 भा द वि कलम- 392,34 प्रमाणे दिनांक 6मे .2019 रोजी फिर्यादी  वंदना बाळासाहेब पाटील (रा.पुणे) हिचे ४० हजार रुपये  किंमतीचे सोन्याची मंगळसूत्र तोडून नेले बाबतच्या गुन्ह्यातील आरोपीच्या तपासाकरिता भुसावळात आले होते.  गुन्ह्यातील संशयित आरोपी अब्बास ईबादत अली इराणी (वय-19 रा.पापा नगर भुसावळ), मोहम्मद अली कंबर अली इराणी (वय-27 रा.भिवंडी मुंबई) असे आहे . या  संशयित आरोपीची गुप्त बातमीदाराकडून  माहिती काढली असता आरोपी भुसावळ शहरात पापा नगर भागात लपलेले असल्याचे समजले व त्यानुसार त्यांना पकडण्यात आले.  दरम्यान आरोपीना बिबवेवाडी पुणे पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही  कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव देशमुख अपर पोलीस अधीक्षक  लोहित मतानी , उपविभागीय पोलीस अधिकारी शगजानन राठोड, तसेच  पोलीस निरीक्षक  देविदास पवार,तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार याच्या मार्गदर्शन खाली पोलिस  उप निरीक्षक  दत्तात्रय गूलिंग, सहायक फोजदार तस्लिम पठाण, पोलिस  नाईक नरेंद्र चौधरी, दीपक जाधव,  महिला  पोलिस नाईक आश्विनी जोगी,पोलिस  कर्मचारी विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, उमाकांत पाटील, संदेश निकम, महिला  पोलिस कर्मचारी ललित बारी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.