जुनेगाव नागेश्वर मंदिर मार्ग ते तीर्थक्षेत्र मुक्ताई मंदिर दरम्यान नवीन पुलाचे आ.चंद्रकांत पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

0

मुक्ताईनगर  : जुनेगाव नागेश्वर मंदिर मार्ग ते तीर्थक्षेत्र श्री संत मुक्ताई मंदिर दरम्यान शेकडो वर्षांपासून चा वारकऱ्यांचा मुख्य मार्ग असलेल्या जीर्ण झालेल्या पुलाची जुनेगावातील रहिवाशी तसेच वारकऱ्यांची मागणी होती.या मागणीच्या अनुषंगाने  आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा पूल मंजूर करून आणला तसेच कोरोना सारख्या संकट कालीन परिस्थितीतही या कामावर निधी देखील खेचून आणला .आज दि.4 मे 2021 रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांचे हस्ते भूमीपूजन अगदी साध्या पद्धतीने पार पडले. हा पूल  पूर्णा नदी बॅक वाटर असलेल्या मुक्ताई घाटाजवळ आहे.

यांची होती उपस्थिती

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यु डी पाटील ,शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, राष्ट्रवादी चे जेष्ठनेते अशोक नाईक, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, काँग्रेस युवक शहर अध्यक्ष पवन खुरपडे, नीरज बोरखेडे, शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे, गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता एल सी सावखेडकर , शेजोळे तसेच माजी ग्रा पं सदस्य दीपक नाईक , दीपक कोळी,  संतोष माळी, राजेंद्र तळेले, विठ्ठल तळेले , हारून शेख, पप्पू मराठे , आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी , प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.