शेतकऱ्यांना ताटकळत न ठेवता तात्काळ पीक कर्ज द्या ; कुऱ्हा वडोदा येथे राष्ट्रवादीची काँग्रेसची मागणी..

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)  हाकेच्या अंतरावर पेरणी आली शेतीच्या मशागतीला, बी, बियाणे, खते, आदीकरून शेती व्यवस्थेला पैशाची अत्यंत गरज असताना पीक कर्जाच्या फाईली जशाच्या तशा बँक मध्ये पडून आहेत. बँकेतील कर्मचारी शेतकऱ्यांना हव्या त्या प्रमाणात सहकार्य करत नसल्याचे दिसून आले.

काही शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे ही तक्रार करता बरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया कु_हा काकोडा शाखा अधिकारी उदय सर यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या तात्काळ कामाचा वेग वाढून शेतकऱ्यांना सहकार्य करा असे सांगण्यात आले.

यावेळी मुक्ताईनगर तहसीलदार मा. श्वेता संचेती मॅडम यांना सुद्धा माहिती देण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष वक्ता प्र विभाग विशाल महाराज खोले ता. सरचिटणीस रवींद्र दांडगे ,काकोडा सरपंच तुळशीराम कांबळे, कुरा उपसरपंच पुंडलिक कपले , ग्रा. प. सदस्य अनंत मधुकर पाटील गोपाळ रामभाऊ पाटील सूळे, मयूर साठे तालुका मीडिया सेल, जि प युवक गटप्रमुख राजेश अजबराव पाटील, काकोडा ग्रा प सदस्य विलास नारायण भोजने प. स युवा गन प्रमुख संतोष पाटील विनोद कांडेलकर संदीप भुते भागवत भाऊ बगाडे नितीन भाऊ कासार दादाराव मारोती वानखेडे शुभम नंदकिशोर खंडेलवाल अनिल चौधरी यशवंत पाटील शिवाजी मुरलीधर भोजने संजय अर्जुन पाटील संतोष साठे विशाल भाऊराव वानखेडे प्रमोद समाधान वाडे कृष्णा प्रदीप कुमार चौधरी अशोक त्र्यंबक पाटील विजय मस्के आकाश कचरे निखिल गणेश मालगे आणि  शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.