जी. एम. डायग्नोस्टिक आणि निमा असोशिएशनतर्फे धन्वंतरी पूजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जी. एम. डायग्नोस्टिक व निमा असोशिएशनच्या माध्यमातून धन्वंतरी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला निमा असोशिएशनचे ५० डॉक्टर उपस्थित होते.

यावेळी डॉक्टरांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रसादाचे वाटप करून क्रस्ना डायग्नोस्टिक्स कंपनीचे आरोग्य क्षेत्रातील योगदानाची माहिती देवून  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी निमा असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. सतीश चौधरी, डॉ. हर्षद त्रिपाठी, डॉ. सतीश वडोदकर, डॉ. जयंत जहागीरदार तसेच पदाधिकारी व इतर डॉक्टर आणि जी. एम. डायग्नोस्टिकचे सर्व डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एम. डायग्नोस्टिकचे मॅनेजर निलेश जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश गवळी, अनिल सोनवणे व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.