जीवे मारण्याची धमकी देत आईवर चाकू हल्ला; मुलावर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे घरगुती भांडणातून मुलाने आईला चाकू मारुन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शमीम बानो शेख पिरन (वय ४०, रा. महापालिकेच्या दवाखान्याच्या मागे पिंप्राळा हुडको) येथे वास्तव्यास आहे. याच ठिकाणी त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील (वय २३) हा सुध्दा राहतो. रविवार ९ जानेवारी रोजी घरगुती भांडणाच्या कारणावरून तन्वीर याने आई शमीम हिच्या उजव्या हातावर भाजी कापण्याचा चाकू मारून दुखापत केली. तसेच मारून टाकण्याची धमकी दिली.

याप्रकरणी शमीम बानो शेख पिरन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील याच्या रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.