जीप व मोटार सायकलचा अपघात; १ ठार, २ जखमी

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धरणगाव पासून जवळ असलेल्या लोणे फाट्याजवळ सवारी जीप व मोटार सायकल यांच्यात भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले.

अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपने लोणे फाट्याजवळ मोटर सायकलला जबर धडक दिली. यामध्ये मोटार सायकलवर असलेला एक जण जागीच ठार झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जीप पलटी होऊन त्यामध्ये असलेल्या २ जणांना थोडे लागले असून काहींना किरकोळ खरचटले आहे.

मृत व्यक्ती व गंभीर जखमी झालेले दोघे वैजापूर जवळ असलेल्या मेलाणे ता. चोपडा येथील असून कंडारी येथे नातेवाईकांकडे आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. घटनास्थळी अतिशय भयावह परिस्थिती पहावयास मिळाली असून जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी कोणतेही वाहन थांबत नव्हते.

एका ओमनी चालकाने माणुसकीच्या नात्याने २ जणांना आयसर मध्ये व एका व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले. त्यांच्यावर उपचार व्हावा यासाठी तळमळ स्पष्टपणे जाणवत होती. प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले.

घटनास्थळी धरणगाव पोलीस स्टेशनचे पीआय शंकर शेळके, एपीआय यांनी  पंचनामा केला असुन घटनेचा अधिक तपास पोलिस यंत्रणा करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.