जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग

0

धानोरा (विलास सोनवणे) : चोपड्यातालुक्याती अतिशय महत्त्वाचे गाव म्हणजे धानोरा होय. खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने पैशाची जुळवाजुळवा करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.

कोरोनामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी…

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक कृषी साधनांचा उपयोग करून शेतकरी आपला विकास करतात. मात्र,  जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यातील धानोरा येथे पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग शेतीसाठी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाची साथ तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आशावादी दृष्टीने बघतात. मागील हंगामात विविध कीड रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले होते.तर चोपड्यातालुक्यात सह अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात घट झाली. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते.

सविस्तर असे कि, करोणामुळे यंदाही रबी हंगामातील कापूस व अन्य शेतमालाची विक्री होऊ शकली नाही. या वर्षी धानोरा,देवगाव, पारगाव,मितावली, पंचक व आडावद तसेच चोपडा तालुक्यात कपाशी,केळी,मका ज्वारी सोयाबिन व इतर पेरा वाढणार आहे. शेतीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी पीक कर्जासाठी चकरा मारत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पीक कर्जाची प्रकरणे लवकर मजुर करावी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

सर्वात जास्त चोपड्यात तालुक्यात  ट्रॅक्टरचा वापर वाढला

त्यामुळे धानो-यासह परीसरात, बिडगाव, मोहरद,कुड्यापाणी,देवगाव पारगाव,मितावली तसेच चोपडा तालुक्यात खरीप हंगामाची कामे करण्यासाठी यंदा ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. बैलाचा वापर करून वखरणी, नांगणीपासून पेरणीपर्यंत तर पीक काढण्यापर्यंतची कामे केली जातात. पण, गाय, बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत नाही. हंगामासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे काही शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करून मशागतीची कामे करीत आहेत.शेणखताचे दर वधारलेकाही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडे पाळीव जनावरांची संख्या बरीच होती. त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी चांगले बैल मिळायचे. गाई म्हशींमुळे उत्तम दर्जाचा खत उपलब्ध व्हायचा. मात्र, हे चित्र आता बदलत आहे. पाळीव जनावरे नसल्याने शेणखत मिळणे कठीण झाले. त्यामुळे पिकांच्या पोषणासाठी शेतकरी इतरांकडून शेण खताची खरेदी करतात. त्यामुळे यंदा शेण खताचे दर वाढले आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक कृषी साधनांचा उपयोग करून शेतकरी आपला विकास करतात. मात्र, जिल्ह्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग शेतीसाठी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाची साथ तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आशावादी दृष्टीने बघतात. मागील हंगामात विविध कीड रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.