मराठा आरक्षण द्या अन्यथा तिव्र आंदोलन करू-जगनभाई सोनवणे

0

यावल (प्रतिनीधी) : यावल चोपडा मतदार संघात किनगाव येथे पी.आर.पी.व संविधान आर्मीसह १० विविध संघटनांनतर्फे पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी पी.आर.पी.चे महामंत्री जगनभाई सोनवणे यांनी सांगीतले की मराठा आरक्षण साठी सुप्रीम कोर्टात पुनर्वीचार याचीका दाखल करावी त्यासोबतच मोदी सरकारने संसदेत कायदा पारीत करून केंद्र सरकार ने राष्ट्रपती महामहिमांच्या स्वाक्षरीने मराठा समाजाला न्याय द्यावा तसेच मराठा धनगर,मुस्लिम समाजाला ही आरक्षण द्यावे.तसेच तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेवर बंदी घालावी कारण उलट्या काळजा ची अभिनेत्री बबिता ने मेहतर समाजाचा जातीवाचक व खालच्या पातळीवर जाऊन आपमान केला आहे.तेव्हा या अभिनेत्री विरुद्ध कायदेशीर अट्रोसिटी अँक्ट दाखल करणार आहोत.तसेच कोळी समाजाला जाती प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे य मागण्या साठी

जळगाव  जिल्ह्यासह मुंबईला सुद्धा लाँकडाऊन उठल्यावर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशी घोषणा यावेळी बहुजन नेते जगनभाई सोनवणे यांनी केली यावेळीपी.आर.पी.चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश भाई बग्गन, यावल तालुका प्रमुख राहुल भाई साळुंके,पी.आर.पी.जिल्हाउपाध्यक्ष रतन भाई वानखेडे युवा तालुका अध्यक्ष नाना साळुंके  शिवसेनेचे पदाधीकारी व किनगाव खुर्द

ग्रा.प. सदस्य बबलु कोळी,राष्ट्रीय मजदूरसेना जिल्हा प्रमुख हरीष भाऊ सुरवाडे,किनगाव खुर्द  चे सरपंच भुषण नंदन पाटील व किनगाव बुद्रूकचे सरपंचपती संजय सयाजीराव पाटील उप सरपंच अनिल रामराव पाटील संविधान आर्मीचे रावेर तालुका प्रमुख चंदुभाई भागेस्वर माजी ग्रा.प.सदस्य मुकेश साळवे,अनिल भोई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.