इंजिनिअर मानेची हजेरी फुल. दिवसभर लाईट मात्र होते गुल

0

किनगाव प्रतिनिधी : येथील ३३ के.व्ही उपकेंद्रातील जिमेदार अधिकारी इंजिनिअर मानेची हजेरी फुल पण गावची दिवसभर लाईट मात्र होते गुल आशी म्हणण्याची वेळ गावकऱ्यावर आली आहे.

याबाबत अनेक वेळा गावकरी खेटे मारतात व लाईट चालू करा म्हणतात पण कांहीना काही फाल्ट असल्याचे लाईनमन सांगतात तेंव्हा इंजिनिअर साहेबांचा फोन लावावा म्हटले तर तो स्विच ऑफ दाखवते. तेंव्हा लाईनमनला साहेब कुठे आहेत म्हटले तर त्यांचे उत्तर माहीत नाही असे मिळते.या ३३ के.व्ही उपकेंद्रा सोमनाथ माने नावाचे इंजिनिअर कार्यरत असून त्यांची हजेरी मात्र फुल असून विज मात्र गुल होतांना दिसते. या गाव अर्तगत वाडयात तर चिमणीचा दिवा लावाव असा प्रकाश असतो म्हणून मोळवणवाडी किंवा सोनवणेवाडीचे नागरिक वैतागले आहेत. एकीकडे करोना महामारीचे संकट व दुसरीकडे विजेचे संकट घरात बसावे तर झोप येत नाही बाहेर फिरावे तर पोलीसांची लाठी खावी लागते माने साहेब लातूरहुन किनगावला डिवटीला येतात ते येतात केंव्हा आणि जातात कधी याचा थांगपत्ताही नाही पण त्यांची हजेरी मात्र फुल असून गावची विज मात्र दिवसभर होते गुल आशी अवस्था नागरिकांची झालेली पहावयास मिळते. हा विजेचा लंपडाव थांबवावा आशी मागणी जोर धरू लागली.महावितरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.एक महिन्या पासुन दरोज लाईट सतत जात आहे.महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी लश देउन किनगांवकराची होणारी तारांबळ थांबवावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.