जिल्ह्यात ८०२ जणांना कोरोनाची लागण; १०९९ रूग्ण कोरोनमुक्त

0

जळगाव –  जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून आलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात एकुण ८०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार ९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरात संसर्ग वाढलेला दिसून येत आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर- १७१, जळगाव ग्रामीण-६४, भुसावळ-६९, अमळनेर-२४, चोपडा-४४, पाचोरा-२८, भडगाव-१०, धरणगाव-२०, यावल-१९, एरंडोल-७३, जामनेर-५७, रावेर-६४, पारोळा-१५, चाळीसगाव- ६९, मुक्ताईनगर-२३, बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यातील २६ असे एकुण ८०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या अहवालानुसार आजपर्यंत १ लाख २४ हजार ६४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख १२ हजार ३५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १० हजार ५५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १९ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.