जिल्ह्यात रोहयोच्या कामांना लालफितीचा फटका

0

जिल्हा परिषद सदस्यांनी कामाबाबत अधिकार्‍यांना केली विचारणा; अनुदानाची रक्कम देण्यास नकार

जळगाव,दि. 21-

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक कामे खोळंबली असून या कामांचा कुठल्याच तालुक्यात तपास नसल्याचा मुद्दा सदस्यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करीत अधिकार्यांना कामांबाबत विचारणा केली. मात्र संबंधित तालुक्यातील बीडीओ याबाबत समाधानकार उत्तरे देऊ शकली नाही. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांना लालफितीचा फटका बसत असल्याचा मुद्दा सदस्यांनी मांडला.

कंडारी ग्रामपंचायतीची चौकशीची मागणी 

भुसावळ तालुकयातील कंडारी ग्रामपंचायतीत अफरातफर झाल्याचा मुद्दा पल्लवी सावकारे यांनी मांडला. चौदाव्या वित्त आयोगांतर्गतच्या कामासाठी आघाऊ रक्कम दिली गेल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत चौकशी करण्यात येईल , असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हस्कर यांनी स्पष्ट केले.

 

रोहमीची एकही विहिर मंजूर नसल्याचा मुद्दा नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित केला. पारोळा, चाळीसगाव, अमळनेर तालुक्यातील विहीरींना रोहमी अंतर्गत प्रशासकीय मान्यता असताना विहिरीचे अनुदान मिळाले नाही. प्रमा ऑर्डर देण्यात आल्याने शेतकर्यांनी व्याजाने पैसे घेऊन विहिरी खोदल्या. मात्र त्यांना जीओ टॅगीग नसल्याचा नावाखाली अनुदानाची रक्कम देण्यास नकार दिला जात आहे. अशा परिस्थितीत कर्ज काढून शेतकर्यांने विहिर खोदली असेल अशा शेतकर्यांनी आत्महत्या केल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न पारोळा तालुक्यातील सदस्यांनी उपस्थित केला. चाळीसगाव तालुक्यात प्रमा ऑर्डर दिल्यानंतर शेतकर्यांनी 471 विहिरी खोदल्या आहेत. मात्र जीओ टॅगिग नसल्याचे सांगत त्या विहिरींचे अनुदान प्रलंबित असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांची डोकेदुखी वाढली आहे.

शिक्षक, ग्रामसेवकांच्या परस्पर प्रतिनियुक्त्या  

चोपडा तालुक्यात चार ग्रामसेवक, आठ शिक्षकांच्या परस्पर प्रतिनियुक्त्या करण्यात आल्याचे निलीमा पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी संबंधित बीडीओ व गटशिक्षणाधिकारी यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हस्कर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.