जिल्ह्यात आज ४२ बाधित रुग्ण आढळले ; तर आठ तालुके निरंक

0

जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात ४२ बाधित रूग्ण आढळून आले आहे तर ३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. दरम्यान, आज एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यात एकही रूग्ण आढळून आलेला नाही.

असे आढळले रूग्ण

जळगाव शहर – २१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-१, अमळनेर-३, चोपडा-१, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-०, पारोळा-०, रावेर-०, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-०१, बोदवड-० असे एकुण ४२ रूग्ण आज आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ५६ हजार ६५९ बधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार ८१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५०२ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज एका रुग्णांचा मृत्यू झाला असून मृताच एकूण  आकडा १३४५ वर गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.