जिल्ह्यात आज दिवसभरात ८४९ नव्या रुग्णांची नोंद ; तर ११ जणांचा मृत्यू

0

जळगाव  । जिल्ह्यात आज बुधवारी दिवसभरात ८४९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.  तर आज ८४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता बाधित रुग्णांसह मृताच आकडा कमी होताना दिसून येत आहे. आज ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३२ हजार ४२३ झाली आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २० हजार १५५ झाला आहे. दोन दिवसांपासून दररोजच्या मृत्युंची संख्याही थोडी कमी झाली आहे. आज ११ जणांचा बळी गेला, त्यामुळे बळींचा एकूण आकडा २३७४ वर पोचला आहे.  दरम्यान, जिल्ह्यात सध्या ९८९४ रुग्ण उपचार घेत आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ८६, जळगाव ग्रामीण २२, भुसावळ १६३, अमळनेर २६, चोपडा ४२, पाचोरा १५, भडगाव ०८, धरणगाव १५, यावल २५, एरंडोल २२, जामनेर ६१, रावेर ५२, पारोळा १६, चाळीसगाव ४८, मुक्ताईनगर १७१, बोदवड ५१, अन्य जिल्ह्यातील २६.

Leave A Reply

Your email address will not be published.