जिल्ह्यात आज दिवसभरात १०४६ नवे रुग्ण ; तर १००६ रुग्ण कोरोनामुक्त

0

जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात १०४६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आजच १ हजार ६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, आज पुन्हा २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाची आकडेवारी स्थिर आहे. दररोज हजार ते अकराशे रुग्ण आढळून येत आहे. आज १०४६ नवे रुग्ण आढळून आले त्यामुळे  जिल्‍ह्‍यात आजच्या बाधित रूग्‍णांमुळे एकुण १ लाख १५ हजार ७९८ बाधित रूग्णांची संख्या झाली असून त्यापैकी १ लाख २ हजार ७९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १० हजार ९४६ बाधित रूग्ण कोविड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २०५८ वर गेला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- १६५, जळगाव ग्रामीण- ३२, भुसावळ-९७, अमळनेर-४१, चोपडा- ११०, पाचोरा- ६०, भडगाव-२७, धरणगाव- ३०, यावल- ३६, एरंडोल- १०१, जामनेर- ६३, रावेर- १०२, पारोळा- ३७, चाळीसगाव- ४३, मुक्ताईनगर- ४३, बोदवड- २२ आणि इतर जिल्हे ०७ असे एकुण १०४६ बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.