जिल्ह्यात आज केवळ ८० नवे बाधित आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात आज केवळ ८० रुग्ण आढळून आले आहे. तर २५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात मागील दीड दोन महिन्यापासून नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होनारे अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४१ हजार २८९ वर गेली आहे. तर १ लाख ३६ हजार ४४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-०५, जळगाव ग्रामीण-१०, भुसावळ-०६, अमळनेर-०४, चोपडा-०३, पाचोरा-०७, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-०२, जामनेर-०३, रावेर-०२, पारोळा-०६, चाळीसगाव-२४, मुक्ताईनगर-००, बोदवड-०१ आणि इतर जिल्ह्यातील ०२ असे एकुण ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.