जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग थांबेना ! आज २६८ रूग्ण आढळले

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज दिवसभरात २६८ नव्या करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरात ७८ रूग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ९ हजार ४५१ वर गेला आहे. तर दिवसभरात  पुन्हा दहा रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ७८, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ २०, अमळनेर ०८, चोपडा ४२,  पाचोरा ०७, भडगाव १९, धरणगाव ०७, यावल ०८, जामनेर ०८, रावेर १५, पारोळा ०२, चाळीसगाव २३, मुक्ताईनगर ०६, बोदवड ०२, अन्य जिल्ह्यातील १.

दरम्यान, आज दिवसभरात २०९ रूग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. तर दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.