जिल्ह्यातील उपनिरीक्षक दर्जाच्या ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

जळगाव :-नाशिक परिक्षेत्रांतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोर्जे यांनी केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील पीएसआय दर्जाच्या ११ जणांची बदली असून इतर जिल्ह्यातून १७ जण बदली होऊन येणार आहेत. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या १२ जणांची बदली झाली असून इतर जिल्ह्यातून ६ जण येणार आहेत. लाेकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून पाेलिस विभागात या बदल्यांची प्रतीक्षा हाेती.

बदली झालेल्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, दीपक ढोमणे, नाना सूर्यवंशी, पंकज शिंदे, राजेश घोळवे हे अहमदनगर येथे, विलाससिंग पाटील, गजानन राठोड, गणेश आखाडे, शेख मोहम्मद अब्दुल रहेमान हे नाशिक ग्रामीण तर सुरेश सपकाळे हे धुळे येथे जाणार आहेत. दिलीप पाटील यांची बदलीला स्थगिती दिली आहे.

अहमदनगर येथून जळगाव जिल्ह्यात राजेंद्र पवार, सिद्धेश्वर गोरे, वैभव पेटकर, महावीर जाधव तर धुळ्यावरून राजेंद्र माळी, राजेंद्र मांडेकर, जगतसिंग महाले, दिलीप माळी, शेखर सावळे, हर्षा जाधव हे येणार असून नाशिक ग्रामीणवरून कैलास आकुले, स्वप्नील नाईक, भाईदास मालचे, गणेश सूर्यवंशी हे अधिकारी जळगाव जिल्ह्यात येणार आहेत. विनंती वरून रामकृष्ण खैरनार यांची नंदुरबार येथे बदली झाली असून नाशिक ग्रामीणवरून राहूल पाटील, युवराज अहिरे, किर्ती जावरे हे जळगाव जिल्ह्यात येणार आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षक मनजीतसिंग चव्हाण, राजू रसेडे, केलसिंग पावरा, सागर शिंपी, दत्तात्रय पवार, हेमंत कडूकार हे नाशिक ग्रामीण येथे, संदीप पाटील नंदुरबार येथे, सारीका कोडापे धुळे येथे तर सुजित ठाकरे, समाधान पाटील, सचिन बागुल हे अहमदनगर येथे जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.