अविनाश माहातेकरांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल भुसावळात रिपाई कार्यकर्त्यांचा जल्लोष

0

फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप

भुसावळ –  महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळात मित्र पक्ष या नात्याने राज्य मंत्री अविनाश माहातेकर यांना मंत्री पद  मिळाल्याबद्दल सर्व समाजबांधवांना आनंद झाला असून त्यांनी भाजप सरकारचे मनस्वी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या तसेच भुसावळात रिपाई कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला . स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर आयोजित या कार्यक्रमात प्रारंभी रिपाई जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात युवक स्टुडंटन्स कार्यकर्ता रोहन सूर्यवंशी यांच्या हस्ते बाबासाहेब यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा केला . प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे , खान्देश प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण जाधव , पप्पू सुरळकर , यांनी मार्गदर्शन केले . तालुका अध्यक्ष बाळू सोनवणे , जिल्हा सचिव प्रकाश सोनवणे, विश्वास खरात, तालुका उपाध्यक्ष गोरखनाथ सुरवाडे, बंटी रंधे , आनंद सूर्यवंशी , बंडू देशमुख , भगवान निरभावने ,भीमराव वाघ ,आदिंसह  रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते ,

Leave A Reply

Your email address will not be published.