ज्ञानबा- तुकारामांच्या गजरात मुक्ताई- राम पालखी पंढरपूरला रवाना

0

जळगाव दि.16- संत अप्पा महाराज समाधी मंदिरातील रात्रीच्या मुक्कामानंतर ज्ञानबा- तुकारामांच्या गजरात मुक्ताई-राम पालखी पंढरपूरच्या दिशेने रविवारी सकाळी 8 वा मार्गस्थ झाली. यावेळी श्रीराम संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी, ह.भ.प. श्रीराम महाराज, ह.भ.प. मुकुंद धर्माधिकारी अरुण धर्माधिकारी, श्रीधर जोशी, आ.राजुमामा भोळे, महापौर सिमा भोळे, जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, जिल्हा मेडिकल असो.चे सुनिल भंगाळे, यासह अबालवृद्ध वारकरी, भजनी मंडळ उपस्थित होते.
जळगावचे ग्रामदैवत श्रीराम संस्थानची फुलांनी सजविलेली संत मुक्ताई- राम पालखी शनिवारी श्रीराम मंदिरातून निघून राम पेठ, भोईटे गढी, कोल्हे वाडा, तळेले वाडा, गोेपाळपुरा, संत बाबाजी महाराज मंदिर, विठ्ठलमंदिरमार्गे, बाहेरपुरा, तरुण कुढापा चौक,जोशी पेठमार्गे संत अप्पा महाराज समाधी मंदिरात दाखल झाली. रविवारी सकाळी 8 वा. पंढरपूरच्या दिशेने वारीने प्रस्थान केले. यावेळी मेहरुण येथील मुक्ताई प्रगटस्थानी आरती होवून तेथील विसाव्यानंतर पालखी शिरसोलीच्या दिशेने निघाली.

Leave A Reply

Your email address will not be published.