जिल्हा परिषद शिक्षकांचे कार्य कौतुकास्पदच

0
जळगाव,(प्रतिनिधी) – कोरोना मुळे संपूर्ण देश हादरून गेला असल्याने प्रत्येकाच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे यातच गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रत्येक तालुक्यातील चेक पोस्ट नाक्यावर ड्यूटी लावण्यात आली आहे. या शिक्षकांचे मनधौर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांनी आज बुधवारी कोळ न्हावी या चेक पोस्टवर भेट घेऊन शिक्षकांचे कौतुक केले.
       शिक्षण आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी सांगितले की, शिक्षक हा असा मनुष्य आहे की, शासनाने दिलेले काम चोख पणे बजावण्याची क्षमता ही माझ्या शिक्षकामध्ये आहे हे एकदा शिक्षकांनी सिद्ध करून दाखवले आहे. ज्ञानदानाचे काम, गावातील सर्वेक्षण, मतदान यादीत नावे समासिष्ठ करून घेणे, निवडणुकीचे कामे, आणि आता कोरोना सारख्या भयंकर परिस्थिती चेक पोस्ट नाक्यावर कर्तव्य बजावणे अशी कामे एक शिक्षक करतो.सभापती शिक्षण व आरोग्य सभापती पाटील यांनी कोळ न्हावी चेक पोस्ट नाक्यावर भेट घेऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे कौतुक देखील केले.
   नागरिकांनी देखील थोडे दिवस घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करा कामा शिवाय घरा बाहेर पडू नका असे आवाहन  शिक्षण आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी केले यावेळी त्याच्या सोबत यावल  पंचायत समिती उपसभापती दिपक पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.