जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ. पंकज आशिया

0

जळगाव – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पंकज आशिया हे भिवंडी-निजामपूर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. पंकज आशिया हे नवीन सीईओ येत आहेत.

डॉ. पंकज आशिया हे भिवंडी-निजामपूर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे जिल्हा परिषदेची सूत्रे येणार आहेत. सध्या डॉ. पंकज अशिया हे एलटीसी म्हणजेच लीव्ह ट्रॅव्हल सवलतीच्या अंतर्गत लेह लडाखमध्ये पत्नी मोनिका चारण यांचे सह सुट्टी साजरी करीत आहेत. सुट्टी चा कार्यकाल २ जुलै पर्यंत आहे तो संपल्यावर म्हणजे सोमवार ५ जुलै रोजी जळगावी येऊन पदभार स्वीकारतील.

उल्लेखनीय असे आहे की भारतीय प्रशासकीय सेवेच्या निकालात देशात 29 वा क्रमांक मिळवून डॉ. पंकज अशिया हे दोनदा सिव्हिल सेवेत निवडले गेले होते, पण चांगल्या क्रमाकाने आयएएस व्हावे असे स्वप्न होते. भारतीय महसूल सेवेत असताना त्यांनी स्वत:चा अभ्यास चालू ठेवला. डॉ. आशिया ३७८ व्या क्रमांकावरुन आत्म-अभ्यासाने वर्ष २०१३ मध्ये आयएएस झाले. दुसर्‍या प्रयत्नात 2014 मध्ये 373 व्या क्रमांकाची नोंद करत पुन्हा आय ए एस झाले. नंतर मात्र २०१६ मध्ये २९ व्या क्रमांकावर येऊन डॉ. पंकज आशिया पुन्हा आय ए एस झाले. असे कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले निष्कलंक अधिकारी म्हणून जळगावला लाभत आहे.

राजस्थानच्या जोधपूर येथील शक्तीनगरमधील रहिवासी असलेल्या पंकजने आपल्या तिसर्‍या प्रयत्नात हे यश संपादन केले. पंकज यांनी प्राथमिक शिक्षण शहरातील आदर्श विद्या मंदिर लाल सागर व २०१२ मध्ये एनआयएमएस मेडिकल कॉलेज जयपूर येथून एमबीबीएस केले आहे. त्याचे वडील डॉ. लाडूदान चरण मंदोर उपग्रह रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत. आई रतन कंवर गृहिणी आहे. भाऊ डॉ. मोहित आणि प्रवीण आशिया आहेत

भिवंडी येथे मनापा आयुक्त पदी नियुक्त होण्यापूर्वी डॉ. पंकज आशिया यांना कोरोना नियंत्रित करण्यासाठी मालेगाव येथे आयुक्त पदी पाठविण्यात आले होते. जेथे आपत्कालीन ऑपरेशन सेंटर तयार करून आणि विविध विभागीय अधिकार्यांना जबाबदारी सोपवून कोरोनावर विजय मिळविण्यात यश मिळवले होते.  भिवंडीमध्येही कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणार्या मृत्यूमुळे आयएएस आयुक्तांची मागणी तीव्र होऊ लागली. त्यानंतर राज्य सरकारने डॉ.आशियांची मालेगाव येथील डॉ.आशियांची चांगली कामगिरी पाहता भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

भिवंडी येथील कोरोना वर मात करण्यात शंभर टक्के यशस्वी होण्या बरोबर त्यांनी महापालिकेच्या खराब प्रशासकीय कामकाजाची यंत्रणा घट्ट करून भ्रष्टाचार रोखण्यासह नगरसेवकांना शिस्त लावली. आपल्या मुत्सद्दी प्रतिभेच्या बळावर डॉ.आशिया भिवंडी शहर विकासाच्या मार्गावर आणण्यात ते यशस्वी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.