भडगाव तालुक्यात पाऊसाची चांगली सुरुवात

0

भडगाव | प्रतिनिधी

तालुक्यात ३ ते ४ दिवसापासुन सतत कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. दि.30 रोजीही भडगाव शहरासह तालुक्यात बहुतांश गावांमध्ये सायंकाळपासुन राञभर पाऊसाची चांगली सततधार सुरु आहे. आज दिवसभर तालुक्यात शेतकर्यांनी शेतांमध्ये कपाशीसह पिकांना रासायनिक खते दिली. कपाशीवर औषध फवारणीचे कामेही केली. तर कुठे कपाशीची बैलजोडीची आंतरमशागतीचे कामे करतांना शेतकरी, शेतमजुर नजरेस पडले. तर कपाशीसह इतर पिकांची निंदणीचे कामेही मजुर, शेतमजुर करतांना दिसत आहेत. तर कुठे उर्वरीत क्षेञात शेतकरी पिक पेरण्या करतांना दिसुन आले. भडगाव तालुक्यात आतापर्यंत एकुण २४४५५ हेक्टर क्षेञावर खरीप हंगामाच्या पिक पेरण्या करण्यात आलेल्या आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकुण ६० टक्के पिक पेरण्या पुर्ण करण्यात आलेल्या आहेत. यात कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तुर, मुग यासह पिक पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकुण १२०.२० मि. मि. पाऊस झाल्याची महसुल प्रशासनाने नोंद केलेली आहे. १०० मि मि पर्यंत पाऊस झाल्याने शेतकर्यांनी जमिनीत चांगली ओल झाल्याने पिक पेरण्या पुर्ण कराव्यात. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी.बी. गोरडे यांनी केले आहे. तालुक्यात सध्याच्या पाऊसाने पिकांसाठी  व पिक पेरण्यांसाठी पोषक वातावरण आहे. या पाऊसाने पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  अनेक शेतकरी तालुक्यात पिक पेरण्या  करीत आहेत.शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.