जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

0

जळगांव. दि.15-
तक्रार नोंदवून देखिल गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या कारणावरून एरंडोल येथील शेतकर्‍याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेथील उपस्थित कर्मचारी व सहकार्‍यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
एरंडोल येथील शेतकर्‍याने तालुका निबंधकांकडे स्थानिक सावकाराविरूदध तक्रार दाखल केली होती. त्या संदर्भात शेतकर्‍याने के.प.पाटील नामक तालुका निबंधक (सहकार) यांचेकडे वारंवार पाठपुरावा करून देखिल कोणतीही दखल घेतली नाही अशी तक्रार जिल्हा उपनिबंधक अधिकार्‍यांकडे आज केली. या कार्यालयाबाहेरच या शेतकर्‍याने अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा उपनिबंधक राठोड यांनी संबंधित या तक्रारीची चौकशी करण्यात येवून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.