जिल्हात पोलिसांचे ऑलआऊट ऑपरेशन

0

जळगाव : जिल्हाभरात ऑलआऊट ऑपरेशन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. शहरातील मध्यरात्री नाकाबंदी करून 243 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 आरोपींना अटक केली.

शहरात मध्यरात्री ऑपरेशन ऑल आउट राबविण्यात आले. कारवाईसाठी पोलिस अधीक्षक ते शिपाई असे एकूण 47 अधिकारी व 452 पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा एकाच वेळी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरला होता. नाकाबंदी व कोम्बिंग अशा दोन विभागात हे ऑपरेशन राबविण्यात आले. या नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यात एकूण 243 वाहनधारकांवर कारवाई करत दंड वसूल केला. पहाटे 3 वाजेपर्यंत सलग कारवाई सुरू होती. शहरातील तांबापुरा, सुप्रीम कॉलनी, मेहरूण, राम नगर, रामेश्वर कॉलनी, कंजरवाडा, शनी पेठ यासह विविध भागांमध्ये ऑपरेशन ऑल आउट राबविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.