मुक्ताईनगर तालुक्यातील विकास कामांचे आ. खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन

0

मुक्ताईनगर :- तालुक्यातील चांगदेव रुईखेडा जि. प. गटातील रुईखेडा पंचायत समिती गणात माजी महसुल कृषी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण पार पडले. यामध्ये कुंड येथे रस्ता काँक्रीटीकरण आणि पेव्हर ब्लॉक बसविणे, पिंप्री अकाराउत येथे रस्ते काँक्रीटीकरण करणे, रुईखेडा येथे रुईखेडा ते देवधाबा रस्ता डांबरीकरण, शिरसाळा ते तरोडा रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन, विठ्ठल मंदिर सभागृहाचे लोकार्पण आणि नुतन सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करणे, तरोडा येथे रस्ते काँक्रीटीकरण करणे, चिखली येथे मागासवर्गीय वस्ती मध्ये रस्ते डांबरीकरण करणे काँक्रीटीकरण करणे, सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करणे इत्यादी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी चिखली येथे सभा घेण्यात आली. त्यामध्ये मार्गदर्शन करताना आ.खडसे म्हणाले , गेल्या तीस वर्षात मुक्ताईनगर तालुक्यात विकास कामे करत आलेलो आहे. परंतु गेल्या साडेचार वर्षापासुन केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विशेष निधी आणता आला. यातुन खेडोपाडी विकास कामे सुरू आहेत. याच विकास कामांच्या जोरावर पुन्हा जनता येत्या निवडणूकामध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान करेल हा विश्वास आहे. याचबरोबर त्यांनी भाजपा सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेल्या अटल विश्वकर्मा कामगार सन्मान योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पंतप्रधान आवास योजना, उज्वला योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, नानासाहेब देशमुख कृषी संजिवनी योजना इत्यादी योजनांची माहिती देऊन उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती

यावेळी माजी केंद्रीय मंत्री एम के अण्णा पाटील, माजी जि प अध्यक्ष अशोक कांडेलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले , विधानसभा विस्तारक विलास धायडे,भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, पं स उपसभापती प्रल्हाद जंगले जेष्ठ कार्यकर्ते चंद्रशेखर बढे,जि प सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, पं स सदस्य सुवर्णाताई साळुंखे, राजूभाऊ सवळे ,विकास पाटील, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे,भाजप गट प्रमुख सुनिल काटे ,चंद्रकांत भोलाने, गुणवंत पिवटे ,राजेंद्र कुलकर्णी,नंदु हिरोळे , विक्रम हिरोळे काशिनाथ नारखेडे , प्रेमचंद बढे, विजय भंगाळे,चंद्रकांत बढे, विलास नारखेडे, रामभाऊ बढे,वासुदेव बढे, प्रा अतुल बढे, स ,सुभाष खाटीक सोपान कांडेलकर, प्रभाकर सोनवणे, अनिल खिरोळकर, निलेश खोसे, युनूस पिंजारी, इकबाल पिंजारी,जयप्रकाश गुप्ता सर्व गावचे सरपंच, सदस्य,विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष ग्रामस्थ उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.